कसा हरि ! स्वस्थ तू आता ?
(चाल : अगर है ग्यानको पाना...)
कसा हरि ! स्वस्थ तू आता ? वेळ ही काय उरलीसे ? ।
राहिला धर्म किति ऐसा, तुला का याद नुरलीसे ? llधृ०।l
जनाची वृत्ति बहिरोनी, पुरी नास्तीकता आली ।
न कुणि पुसताति कोणाला, प्रेम-मायाच हरलीसे ।।१।।
न साधू लक्ष दे ध्मा, न पंडित सांगती वर्मा ।
स्वार्थता भासते सगळी, दयेची वाट सरलीसे ।।२।।
अशी ही अवदशा आता, कोठवरि ठेविशी देवा ! |
हाक घे दास तुकड्याची, वासना हीच धरलीसे ।।३॥