जगाचा मोह ना सोडी, कसा होशील रे ! साधू ?
(चालः जगी हा खास वेड्यांचा...)
जगाचा मोह ना सोडी, कसा होशील रे ! साधू ? I|धृ०।।
बहू लोकेषणा मागे, न मिळतो वेळ ध्यानासी ।
खोवुनी वेळ ही ऐसी, कसा होशील रे ! साधू ? I|१।।
इंद्रिये स्वैर चहू देशी, विषय भोगावयासाठी ।
लावुनी पाश हा पाठी, कसा होशील रे ! साधू ? ।|२॥
फसविती वासना सगळ्या, जगाच्या सौख्य-मोहाने ।
न वृत्ती स्थीर करिशी तू, कसा होशील रे ! साधू ? ||३।।
म्हणे तुकड्या गृहस्थी हो, करी संसार नीतीने ।
जराशा पोट-भीतीने, कसा होशील रे ! साधू ? ॥४॥