तुझ्या उभा मी सामोर ।

तुझ्या उभा मी सामोर । तरी वाट बघती चोर  ॥
तुज सोडूनिया जाता । काय करितील अनंता! ॥
नाही भरवसा देवा! । लाज राखरे केशवा! ॥
तुकड्या म्हणे दिवसा डाका । तरी रात्री कैची शंका? ॥