तुम्हा वाटावे कौतुक I

तुम्हा वाटावे कौतुक । सुखे ऐकावी ही हाक! ॥
चोर पोर नेती वाटे । घोर कुंभिपाकी काटे ॥
तुमचे म्हणविल्यावरी । काय देवा! ही धिंडोरी? ॥
तुकड्या म्हणे नका पाहू । काळा हाती नका देऊ ॥