हिंदभूच्या भाविकांनो ! आत्मबल मिळवा अता

(चालः ठेविले पाऊल दारी...)
हिंदभूच्या भाविकांनो ! आत्मबल मिळवा अता ।
भ्याड वृत्ती सोडुनी,   हृदयी    धरा    बुद्धीमत्ता ॥धृ०।।
हात जोडुनी का असे हो ! धर्म धर्म चि बोलता ? ।
बोलणे हे     सोडुनी,   दावा    स्वधर्माची    सत्ता ॥१॥
अंत:करणे मोकलोनी, एक व्हा एकी करा ।
संप्रदाय नि पंथ हे,    विसरुनी   घ्या   कर्तव्यता ।।२।।
देव सर्वाचा सखा, आम्ही तयाची लेकरे ।
भूकद मग का कोरडा ? जाळा जशी जळते चिता ॥३॥
शादव्य ज्योती चमकु द्या, भानू जसा रविमंडळी ।
र्जुनासम वीर व्हा, हा    वेळ   ना    दवडा   रिता ।।४॥
स तुकड्या सांगतो, ही वेळ जाता आळसे ।
रूढि ग्रासिल आपुली,   जाईल   ही   स्वातंत्र्यता ।।५।।