लागो प्रभु ! तव छंद मनाला, लागो प्रभु!

लागो प्रभु ! तव छंद मनाला, लागो प्रभु! ।।धृ०।।
अघोर हा भव-पाश-तमाशा, स्वप्नासम फसवी मम आशा ।
सोख्य नसे मन वांछि तयाला । लागो०|।९॥।
सुख -शोधार्था व्यर्थ भटकलो, सुख नाही पण दु:खि लटकलो।
फास गळा यमकुंड मिळाला । लागो० ।।२॥|
गुरु-पदसेवा नाठव झाली, विषय-श्रंखला येउनि पडली ।
प्राण तुझ्याविण विपरित गमला । लागो ०।|३॥।
आठवती नाठवती झाली, नाठवती येउनिया पडली ।
संगतिने निज जीवहि फसला । लागो ०।।४॥।
श्रीगुरु आडकुजी सुख-सखया ! ब्रीद तुझे जाइल की वाया ।
तुकड्यादास पदांबुजि धाला । लागो ०॥।५॥।