राहता नये जगी या भोळीव दाखवोनी
(चाल : ईश्वरको जान बंदे...)
राहता नये जगी या भोळीव दाखवोनी ! ॥धृ 0॥
अति क्रूर षड्विकारे जिव घाबरे थरारे ।
संसार हा बिकटची वाटे तरे न कोणी ॥१॥
जनलोक त्रास देती नच संत-संग साधे ।
व्यसनात रमविण्याला बहु संगि ये दुरूनी ॥२॥
वैराग्य अंगि येता पळती दुरी उरीचे ।
खाती लुटोनि सगळे अति प्रेम. दाखवोनी ॥३॥
तुकड्या म्हणे रहावे जन लावुनि जगी या ।
आसक्ति तोडुनिया. सत्कर्म हे करोनी ॥४॥