योगी करी समाधी रंगोनि अंतरंगी

(चालः रसने ! न राघवाच्या...)
योगी करी समाधी रंगोनि अंतरंगी ॥ धृ 0॥
साधोनि कुंभकाला ब्रह्मांड - शोध घेती ।
राहती निवांत तेथे  त्रिकुटी  सदा  निसंगी ॥१॥
षड्चक्र - भेद पावे तनु-अंतरंगि जाता ।
जिव हा सदा सुखावे स्वरुपी तया अभंगी ॥२॥
मन उन्मनी स्थिरावे भ्रम-भेद हा विरोनी ।
अमृत - कुंड पावे   अति   गोड-गोड  गुंगी ॥३॥
अति स्वर्गतुल्य शोभा पावे तनूत योगी ।
तुकड्या म्हणे बघा हे मग जन्ममरण भंगी ॥४॥