सुख येइ़ घरा अति कष्ट करा कष्टाविण शांति न होइ नरा
(चाल: गुरु तुमहि तो हो गुरु... )
सुख येइ़ घरा अति कष्ट करा कष्टाविण शांति न होइ नरा ॥धृ॥
कष्टचि करता संत निमाले तरले या भवदु:खपुरा ॥१ ॥
कष्टे राज्यहि पावे सुगमे आळस हा अति दूर करा ॥२ ॥
कष्टे. धर्म कर्म व्रत होते कष्टचि नेई आत्म-पुरा ॥३॥
तुकड्यादास म्हणे ज्या कष्टी नारायण हो तेचि वरा ॥४ ॥