चल ऊठ अता चल ऊठ अता बघ भानु करी उपदेश मुला
(चालः गुरु तुमहि तो हो गुरु....)
चल ऊठ अता चल ऊठ अता बघ भानु करी उपदेश मुलाllधृ॥
तापुनि कष्टि करी देहाला द्यायासी जनतेला l
कष्टचि हे सुख देति मनाला ज्या कष्टे जन - लाभ भला ॥२॥
लाज घेउनी का बसलासी ? जाशिल शेवटि दुःखि खुला ॥३॥
तुकड्यादास म्हणे गुज समजी करि सेवा जगव्यापि खुलाll४॥