अति व्याकुळ हे मन शांति नसे करू काय कसे ? न सुचे हरि रे !
(चालः गुरु तुमहि तो हो गुरु...)
अति व्याकुळ हे मन शांति नसे करू काय कसे ? न सुचे हरि रे ! ॥ धृ 0॥
जप-तप नाना करुनी श्रमलो चंचल मन हे नावरि रे ! ॥१॥
तिर्थी धोंडापाणी पुजिले पक्ष्यासम फेरे करि रे ! ॥२॥
दान - पुण्य योगहि ते केले वाढे अभिमानचि उरि रे ! ॥३॥
तुकड्यादास म्हणे ज्ञानाविण सुख नसे दुसरे तरि रे ! ॥४॥