अभिमान खरा अति दुःखद हा कधि जाउ नयेचि तया वाटे

(चाल; गुरू तुमहि तो हो गुरु ...)
अभिमान खरा अति दुःखद हा कधि जाउ नयेचि तया वाटे ॥ धृ 0॥
क्षण एक न राहि धरी लिनता क्षण एकचि येति तया काटे   ॥१॥
नसताचि कुळी अति होत बळी विषयास धरी अपुल्या लाटे ॥२॥
धन द्रव्य मिळे तरि काय   पहा मग दीन जना  दुरुनी  दाटे  ॥३॥
तुकड्या म्हणे तोचि खरा नर हो ! अभिमान न ज्या क्षणमात्र उठे ॥४॥