श्रम घेउनिया भ्रम जात नसे मग काय असे जन हे करिती
(चाल: गुरु तुमहि तो हो गुरु...)
श्रम घेउनिया भ्रम जात नसे मग काय असे जन हे करिती ll धृ॥
मन लावुनिया संसार करी परि दुःख अति शरिरी भरती ॥१॥
अति द्रव्य कमावुनि आणुनिया मग चोरांचे घरटे भरती ॥२॥
सुत-दारि अतिशय मोहुनिया मग शेवटि आपणची मरती ॥३॥
तुकड्या म्हणे एक न लाभ मिळे मग कष्ट करोनी काय गती ? ॥४॥