रमवा मन हरि - रंगी रमवा

(चाल: भूषविशी जननीला... )
रमवा मन हरि - रंगी रमवा मन हरि-रंगी । गडे हो ॥धृ0॥
विषयसुखाची सोडुनि आशा मस्त रहा  सतसंगी ॥१॥
सुख दुःखासी मारुनि लाथा निर्भय व्हा भवभंगी ॥२॥
कोणी न येती जन सांगाती  येइल   राम   प्रसंगी ॥३॥
तुकड्यादास म्हणे हरि गा रे  ! तोडुनि माया ढंगी ॥४॥