सावळ्या ! ये, निर्मला रे ! का असा अजि कोपला?

(चाल: पांडवा सप्राट पदाला...)
सावळ्या ! ये, निर्मला रे ! का असा अजि कोपला? ।।धृ० ।।
भक्त-महिमा वाढवाया, धावसी का रामराया ?
दिन हा घे आजि पाया, का कुठे तू जोपला?।।1।।
द्रोपदीच्या संकटासी, लवकरी धावोनी येसी ।
जणीचे दळणे दळीसी, मजवीशी का लोपला? ।।2।।
ध्रुवबाळा रूप दावी, चोखेयाची ढोरे नेई ।
दास तुकड्या आस वाही, दर्शनी या सोपला ।| 3।।