करशिलना कर खाली ?
(चाल: भूषविशी जननीला..)
करशिलना कर खाली ? धरशिलना वनमाली ! पदरी ? ॥धृ॥
दुस्तर हा भव-सागर वाटे तुजविण कोणि न वाली ॥ धर0 ॥१॥
काम-क्रोध अति क्रूर श्वापदे बहुत अनावर झाली ॥ धर0 ॥२॥
आश्रये तुझिया काळ निभवला आजवरि वेळहि गेली ॥ धर0 ॥३॥
तुकड्यादास म्हणे शेवट हा तुझिया स्वरुपी घाली ॥ धर0 ॥४॥