येशिलना गुरुराया ! येशिलना

(चालः भूषविशी जननीला... )
येशिलना गुरुराया ! येशिलना गुरुराया ! मनि   या ? ॥धृ0॥
सत्य ज्ञान तू ज्योति - स्वरूपचि तुज अर्पिन ही काया ॥१॥
स्थापिन तुजला हृदयमंदिरी चित्त लाविन  गुण   गाया ॥२॥
लक्षि ठेवुनी बोध - वचन तव मग वळविन तशि काया ॥३॥
तुकड्यादास म्हणे घे करुणा उद्धरि   मज   दीना   या ॥४॥