कृष्ण मनी रमला हा कृष्ण मनी
(चाल: भूषविशी जननीला...)
कृष्ण मनी रमला हा कृष्ण मनी रमला हा अमुचा ॥धृ0॥
रूप सावळे अति सुंदर हे जीव तिथे नमला हा ॥१॥
मोर - मुकुट कुंडल अति साजे भावरुपी गमला हा ॥२॥
वाजवि अधरी मंजुळ पावा ध्वनि कर्णी घुमला हा ॥३॥
तुकड्यादास म्हणे अति मोहक मार्ग जीव क्रमला हा ॥४॥