सुखकर कर सत्संगा मनुजा !

(चालः सतत विमल भजन नामा..)
सुखकर कर सत्संगा मनुजा !
पावन हा नरदेह करूनी, सहज करी भवभंगा मनुजा ! ॥धृo।l
सुख-दुःखे ही किति भोगावी ? शांति नसे संसारी मनुजा ! ।
विमल सुखा दे माउली ही, देइल  भक्तिसुरंगा   मनुजा ! ।।१।।
सत्संगाविण मार्ग न लाभे, श्रुति स्मृतिचे हे कोड मनुजा ! ।
तुकड्यादास म्हणे सुखी हो, त्यागुनि सकळ कुसंगा मनुजा ! ।।२।।