साधुनि घे काहि जरा, कीर्ति व्हावया
(चालः मंगलमय नाम तुझे...)
साधुनि घे काहि जरा, कीर्ति व्हावया ॥धृ०॥
नाहितरी जाशि फुका, कोणी नच देई रुका ।
खाशिल यमद्वारि धका, नाहि त्या दया ।।१।।
अखिल विश्व हे अचाट,कठिण जन्म-मृत्यु-घाट ।
काम - क्रोध यांचि वाट, दाविते भया ।।२।l
शरण जाइ संत-पदा, करुनि घेड़ बोध सदा ।
चुकवुनि घे आपदा हि, मुक्ति घ्यावया ॥३॥
तुकड्याची हाक ऐक, नाहितरी होय शोक ।
पावशील लोकि दुःख, थोर कष्ट या ॥४॥