अवचित हा संत - संग, लाभला अम्हा
(चालः मंगलमय नाम तुझे...)
अवचित हा संत - संग, लाभला अम्हा ॥धृ०॥
पावन हा देह होय, क्षणभरि जरि बोध लाहे ।
उघडूनि घे कर्ण जरा, सोडुनी भ्रमा ।।१।।
दूर प्रभू राहतसे, पाप - पुण्य पाहतसे ।
कर्म-फळा देत तसे, करुनिया जमा ।।२।।
चुकविति हे कर्मबंध, लावुनिया कृष्ण छंद ।
दुर्दैवहि होत मंद, दाविती सिमा ।।३।।
तुकड्याची मात ऐक, घे गुरुचे बोध-सौख्य ।
तोडी भव - क्लेश दुःख, पुण्य - पथ क्रमा ।।४।।