जिव पक्ष्यासम झाला थार न कुणि दे याला
( चाल : भूषविशी जननीला ... )
जिव पक्ष्यासम झाला थार न कुणि दे याला I हरि रे ! ॥धृ0॥
जिकडे जावे तिकडे भ्यावे निर्भय सुख न मनाला । थार 0॥१॥
सकल जगत हे स्वार्थ भरले दूर करी गरिबाला । थार0 ॥२॥
अपुले म्हणूनी परके होती कसची नाति तयाला ? । थार0 ॥३॥
तुकड्यादास म्हणे पदरी घे देउनि नाम अम्हाला । थार0 ॥४॥