रमशिलना या देही ? सावळिये गुरु आई !

(चाल: भूषविशी जननीला...)
रमशिलना या देही ? सावळिये गुरु आई ! अमुची ॥धृ0॥
न्हाणिन तुजला अश्रु - जलाने वाहिन भाव - फुले ही I साव0॥१॥
बसविन सिंहासनि हृदयाच्या सोहं दीपक - छायी I साव0 ॥२॥
जीवभाव तुज अर्पण करुनी  देह तुझ्या पदि वाही I साव0 ॥३॥
तुकड्यादास म्हणे वर दे हा न उरो भेद कुठेही I साव0 ॥४॥