कसा निभवशी काळ कळेना, मज सद्गुरु माते !

चाल: चंद्रकांत राजाची कन्या...)

कसा निभवशी काळ कळेना, मज सद्गुरु माते !
मृत्यु बरा परि चिंता नलगे, ने  अपुल्या पंथे ।|धृ० ।।
कामादीक हे शत्रू गांजिती, वरचेवर भारी ।
किति सोसू आपदा आई गे ! बनलो अविचारी ।।१॥।
नष्ट प्राप्तिला कष्ट करीता, तनु गेली सारी ।
सुखदुःखाची वाट पाहता, भय झाले भारी।।1२॥।
जिकडे तिकडे प्रपंच लहरी, उठती घनघोरी ।
आयुष्याची कमती झाली, ना पुरती दोरी।।३॥।
तुकड्यादासा आस लावुनी, का फसवी केली ?
ब्रीद तुझे गे ! थोर म्हणउनी, वरचेवर झेली ।।४॥।