कष्ट करा हरि भेटे कष्ट करा हरि भेटे
(चाल: भूषविशी जननीला..)
कष्ट करा हरि भेटे कष्ट करा हरि भेटे । गडे हो ! ॥धृ0॥
दीन जनांची सेवा साधा सोडा व्यसने खोटे ॥१॥
प्राण खर्चि द्या धर्मांकरिता घेउनि हाति नरोटे ॥२॥
मान जगाचा समुळाचे त्यागा वाहू नका त्या लाटे ॥३॥
तुकड्यादास म्हणे गा हरीला मग भव - भय हे खुंटे ॥४॥