साक्षि असा जगती या
(चाल: भूषविशी जननीला...)
साक्षि असा जगती या साक्षि असा जगती या । गडे हो ! ॥धृ॥
मायेचा हा सकल पसारा भ्रमवू नका मन वाया ॥१॥
जड देहाचा बंध जिवासी आत्मा अमर सदा या ॥२॥
सुख - दुःखे ही लिंगतनूसी आशेची पडछाया ॥३॥
तुकड्यादास म्हणे निर्भय व्हा धरुनी गुरुच्या पाया ॥४॥