कोणा म्हणशिल घ्या कैवार

(चाल : तुम्हारे पूजनको भगवान ...)
कोणा म्हणशिल घ्या कैवार जेव्हा पाहशि अमाचे द्वार ?॥ धृ॥
येइल कोण आडवा बाप ? चुकनिल काय तुझा रे ! ताप ?
करिशी काय असा व्यवहार ? ॥ जेव्हा0 ॥१॥
येतिल कायय आई- गणगोत ? दावाया कर्तव्य सुज्योत ।
करिशी का व्यर्थ    हा   प्यार I जेव्हा0 ? ॥२॥
चोरी करूनी पाळी लोक त्यातुनि भोगतील का एक ?
पहा    वाल्मिकऋषी -  उदगार I जेव्हा0 ॥३॥
तुकडयादास म्हणे रे  ! शोध घेई सतसंगाचा बोध ।
नश्वर     हे    सगळे     जाणार  l जेव्हा 0 ॥४॥