जग हे गुणकर्मांची खाण मिळेना

( चाल : तुम्हारे पूजनको भगवान ... )
जग हे गुणकर्मांची खाण मिळेना दुसऱ्याला मुळी मान ॥धृ0॥
ज्याने द्यावे त्याने घ्यावे अपुल्या दैवे लेणे ल्यावे I
नाही तरी व्यर्थ   हा   प्राण ! मिळेना 0 ॥१॥
कोणी ढोंगी पुढती येती शेवटि मोठी होय फजीती ।
जन फेकी   निंदेची   घाण । मिळेना0 ॥२॥
दिसती पाय पाळण्या आंत परि ते दाविति अपुली जात ।
लपेना   देउनियाही   दान । मिळेना0 ॥३॥
तुकड्यादास म्हणे सर्वांसी सादर व्हावे सत्कर्मासी ।
तेव्हा धाडिति देव विमान । मिळेना0 ॥४॥