कासयास मज घातले या जन्मी ?

कासयास मज घातले या जन्मी ? । रंगलो ना नामी कधी तुझ्या ।
प्रपंच तो गोड वाटे मज फार । विपय सुंदर सेवो लागे ॥
काम-क्रोध-लोभ आडवे पडोनी । देती त्रास मनी मजलागी ॥
म्हणे तुकड्यादास त्यजू काय प्राण ? । अजूनी चरण न दाविसी ॥