काय मी पातक केले गा श्रीहरी !
काय मी पातक केले गा श्रीहरी ! । म्हणोनिया दुरी करिसी मज l
पातकांचा नाश होईल बा ! जेणे । करा हो शहाणे बोध मज ।
अडवितो मनी कर्माचा प्रसंग । प्रपंचाचा संग तुटो माझा ॥
म्हणे तुकड्यादास पाहसी का अंत ? । मांडीला प्राणांत रामराया ।