तुझं वाटे देवा ! अभक्त मी व्हावे

तुज वाटे देवा ! अभक्त मी व्हावा । म्हणोनी केशवा ! अंतरसी l
गोड वाटे मज लोभ तो विशेष । होई जरी नाश आयुष्याचा ॥
क्षणिक वैराग्य साठवी शरीरी । पूर्ण ते अंतरी प्रेम नाही ॥
तुकड्या म्हणे नुरे फरजीतीस पार । होईल की भार काळावरी ॥