ओरडुनी सांगावे ? देवा ! काय तुम्हा नच ठावे ?

(चालः हे राष्ट्ररुपिणी गंगे...)
ओरडुनी सांगावे ? देवा ! काय तुम्हा नच ठावे ? ॥धृ0॥
तारुण्याचे कठिण प्रसंगी मन चोहिकडे धावे ।
जप - तप - साधन काय करी हे ? चित्त भ्रमे बहिरावे ॥देवा ! ॥१॥
संत - समागम पुराण - पोथी जरी ऐकण्या जावे ।
निद्रा डाकिण बळेच निजवी हृदया बोध न पावे ॥ देवा ! ॥२॥
तुकड्यादास म्हणे अम्हि ऐसे साथि कुणाला घ्यावे ? ।
तुझ्या कृपेविण सर्व शीण हा वदलो सत्य स्वभावे ॥ देवा ! ॥३॥