अवघड घाट भवाचा चढता होतो थाट जिवाचा

(चालः हे राष्ट्ररूपिणी गंगे...)
अवघड घाट भवाचा चढता होतो थाट जिवाचा ॥धृ0॥
कर्म - नदीची धार उफाळे लाटसमूह मनाचा ।
कामक्रोध - मद - मत्सर मासे करिती नाश तनाचा ॥ चढता0 ॥१॥
विषय - भोवरा गरगर फिरवी धाक न ठेवि कुणाचा ।
जरा भटकता आडमार्गि कुणि सररर ओढति खाचा ॥ चढता0 ॥२॥
तुकड्यादास म्हणे तो तरला होइल भक्त गुरुचा I
नाहि तरी चौऱ्यांशी भ्रमणे घात करी नेमाचा ॥ चढता0 ॥३॥