काय कुणाचे नेशी ? अंती तूच

(चाल: हे राष्ट्ररूपिणी गंगे...)
काय कुणाचे नेशी ? अंती तूच गती भोगियशी ॥धृ0॥
सांगति संत गोड उपदेशा दूर तया टाळियशी ।
अनुभव आल्या वेळ नुरे मग जाशिल कोणापाशी ? ॥अंती0 ॥१॥
 संसाराचे वीष गोड हे वाटे क्षणि अपुल्यासी ।
हृताश होशिल या भोगाने दुःखरूप मग होशी ॥ अंती0 ॥२॥
खी - पुत्रादिक पाहति मौजा लावि सगाई खासी ।
लीन इंद्रिये होतिल जेव्हा पळतिल दूर घरासी ॥ अंती 0 ॥३॥
साथ साध रे ! काहि तरी ही वेळ काय खोवियशी ? ।
तुकड्यादास म्हणे प्रभुराया घे धरूनी हृदयाशी ॥ अंती0 ॥४॥