ऐका संतांच्या वचनासी धरूनि बसा हदयाशी

( चाल : बाळा ! जो जो रे ... )
ऐका संतांच्या वचनासी धरूनि बसा हदयाशी ॥ धृ 0॥
अमुचे संत असे ना करिती लोका पुत्रचि देती I
धनही दाखविती जन म्हणती सोडा त्यांची कुरती ॥१॥
कोणी म्हणताती संत भले पावन आम्हा केले ।
होते अंगीचे भुत गेले दावण द्या सांगितले ॥२॥
कोणा दाखविला दृष्टांत येउनिया स्वप्नात ।
सांगे संत तया कानांत उडवा द्र्व्य बहुत ॥३॥
कोणी जन म्हणती संताने शाप दिला रागाने ।
करेले वाटीळे घर त्याने लावियले जादुने ॥४॥
कोणी म्हणताती मन जाणे बोलू नका कपटाने ।
जाळिल शापाने तापाने कितिक मारले याने II५॥
ऐसी समज बहू लोकांची बुद्धी जळली त्यांची ।
नाही ज्ञन तया स्वार्थाची सगळी कावेबाजी ॥६॥
संत न देति कुणा विषयाला भोगाया जनतेला ।
पापे करण्याला जन्माला शोधा शास्त्र - मताला ॥७॥
देती एकचि ते जनतेसी ब्रह्मानंद - पदासी ।
वाहते चिदगंगा हृट्देशी घ्या कळते हे ज्यासी ॥८॥
तुकडयादास म्हणे ते ढोंगी बनती संत विरागी ।
फसवुनि लोकासी बहुरंगी लाविति दास कुसंगी ॥९॥