विपरीत हवा दिसते नयनी, हरि काय

(चाल: आशक मम्त फर्कीर हवा...)
विपरीत हवा दिसते नयनी, हरि काय करील मना न कळे ॥ध्रु०॥
न्च रीत उचीत कुणा करवे, धरबे न ॠषी - वचना हृदयी ।
अति कामभरे नच नेम उरे, श्रृतिशाखत्र, तया मदने न कळे ।।१॥
करि त्याज्य न राज्य कुचाल जनी, हसताति मनी दुरूनी झुरुनी ।
बिघडेल कधी ही भारतभू ? परके जनही द्विविधा घुसळे ।।२॥
ऋतु चालति चाल कुचाल अति, नच पृथ्वि पिके उरती पुरती ।
मरती कई अन्न मिळे न पुरे, नरनारि न लुगडी - वख़ मिळे ।।३॥
रुसल्या मरिमाय जरा कुलरा, वरि प्लेग-कॉलरा भीति न ज्वरा ।
नच सुख जिवा इकडे तिकडे, मन घाबरले अति, धीर ढळे ।।४॥
नच धर्म न कर्म सुसंगतिही, वळती जन हे विषयी अतिही ।
तुकड्या म्हणे स्वाधिन हे हरिचे, कळते प्रभुला कारण सगळे ॥५॥