हरिनाम जपा मन लावुनिया

(चालः आशक मस्त फरकीर हुवा...)
हरिनाम जपा मन लावुनिया, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥धृ०॥
अति दुर्जन हे रिपु टूर करा, जे काम क्रोध मद-लोभ अति ।
गुरुपायि चला हृदये नमुनी, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥१॥
रोज करा अभ्यास सदा, जी वेळ मिळे जो काळ मिळे ।
अति प्रेमभरे विरहे प्रभु गा, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥२॥
सत्य सदा वदनी वदणे, समजा सम सर्व जिवा प्रभुच्या ।
अति निर्मळ गोड रहा जगती, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥३॥
मान असो अपमान असो, निति - धर्म न सांडुूनि जाउ कुठे ।
तुकड्या म्हणे निश्चय घ्या ऐसा, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥४॥