वाटे मनामाजी लाज I

वाटे मनामाजी लाज । तुझे न घडलेचि काज ॥
सदा पोटाच्या चिंतनी । काळ जातो चक्रपाणी ॥
सावरेना काही केल्या । अंगी उपाधि लागल्या ॥
तुकड्या म्हणे तूचि साक्ष । वाटे दुरावो हे लक्ष ॥