लाज वाटे जीवा मनी I

लाज वाटे जीवा मनी । काय केले मी जन्मुनि ? ॥
नाही घडली हरिची सेवा । नाही संसारीचा दिवा ॥
नाही प्रपंच परमार्थ । जन्मी घडला नाही अर्थ ॥
तुकड्या म्हणे आता तरी । देवा! बुद्धि दे अनुचरी ॥