अगं वृत्ति ! कुठे तू जाते? तव प्रेम कुणाशी जडले?
(चाल: उध्दवा ! शांतवन कर जा...)
अगं वृत्ति ! कुठे तू जाते? तव प्रेम कुणाशी जडले? ।|धृू०।।
सोडशील का गे मजला? मम हृदय अधिर गडबडले ।
सुखरूप-स्थला सोडुनिया, तव प्रेम कसे गे उडले?
(अंतरा) चल फिर अता माघारा ।
सोड हा बहिर्मुख चारा ।
का घेसि विषय-सुख-वारा ?
का अनल नेत्र हे चढले? तव प्रेम कुणाशी जडले? ।।१॥।
तुज आठवते का माझी, मित्रता कितिक दिवसाची ?
विसरलीस का गे अपुल्या, त्या याद निज स्वरुपाची?
अस्मिती ब्रह्मः- भानूच्या, तू. लाट तेजपुंजाची।
(अंतरा) असुनिया अशी का वेडी?
धरितेस विषय-भ्रम-बेडी।
तुज कुणी दाविली गोडी?
विपरीत असे का घडले? तव प्रेम कुणाशी जडले १?॥।२॥।
स्वानंदपरीमल घ्याया, तुज स्वाद् नसे का आला?
साम्राज्य ब्रह्म-भुवनाचा, स्वातंत्र्ययणा ना रुचला?
की वरताना सर्वज्ञा, तव प्रेम अचानक विरला?
(अंतरा) कोणते दु:ख तुज होते?
म्हणउनिया जाऊ पहाते ।
व्यभिचारपणा अनुसरिते ।
तुज हवे काय ते नडले? तव प्रेम कुणाशी जडले? |।।३॥|
अग ! सोडशील मम आशा, लागेल सवेच दुराशा]
चौऱ्यांशि लक्ष योनींच्या, जाशील बांधुनी पाशा ।
वबळवील कोण मग तुजला? भोगशील गर्भ-इराशा ।
(अंतरा) हो ऊर्ध्व अंतरामाजी।
उ बघ नको करु इतराजी।
11:17: तुकड्याचि आस ही गर्जी ।
सांगता चित्त धडपडले, तव प्रेम कुणाशी जडले? |।४॥|