जरा सेवा झाली जीवे I
जरा सेवा झाली जीवे I दंभ मत्सर सरसावे ॥ मना वाटे मीच थोर I ताण मारी दुजावर ॥ जाळी जाळी हा स्वभाव I देवा ! सांगितला सर्व ॥ तुकड्या म्हणे हीन बुद्धी I तुझ्या नामी लागे कधी ? ॥