अमुच्या कर्मासी चुकवाया योशिल का यदुराया !
(चाल: बाळा ! जो जो रे...)
अमुच्या कर्मासी चुकवाया योशिल का यदुराया ! ॥धृ0॥
पापी जीव अम्ही अति वेड़े विषयांचे जणु रेडे I
न सुचे काहि दुजे कोणिकडे चुकवाया हे कोडे ॥१॥
क्षणभरि स्थिर नाही मनवाणी फिरते पक्षावाणी ।
परोटचि भरण्यासी चहू देशी होइल रे ! गति कैसी ? ॥२॥
हाजी लोकांसी प्रिय वाटे नामी तुमच्या काटे I
अंगा बहु येती उफराटे काळ कसा हा कंठे ॥३॥
तुकडयादास म्हणे ऐशासी देशील कोणा हाती ?
इतुके करशील का हषिकेशी ! देशिल भक्ती यासी ? ॥४॥