ऐसा धीर आहे मनी I

ऐसा धीर आहे मनी । म्हणुनी आलो लोटांगणी ॥
देवा! तारी रे लौकरी । पुढे वेळ नाही बरी ॥
तू तो दीनांचा दयाळू । दास-दासांचा कृपाळू ॥
तुकड्या म्हणे मी पामर । शरण आलो तार तार ॥