आम्ही कोवळ्या मनाचे I

आम्ही कोवळ्या मनाचे । साथी नाचत्या जनाचे ॥
सुख जेथे तेथे धावू । दुःख पाहता दुरावू ।॥
क्षणी उठती विकल्प । नाना येताती संकल्प ॥
तुकड्या म्हणे तुझी कृपा । होय तरीच मार्ग सोपा ॥