सोडू नये वाटे पाय I

सोडू नये वाटे पाय I शीर तैसे पदी राहे ॥
का हो कराल का ऐसे । मना रंगू द्या समरसे ॥
नका फेकू टाकू दुरी । विरह दाटे या अंतरी ॥
तुकड्या  म्हणे सुखसागरा । बाप रखुमादेवीवरा! ॥