तुझ्या पाहो मुखाकडे I

तुझ्या पाहो मुखाकडे । वारी देवा! हे साकडे ॥
नको जाऊ देऊ दुरी । पाया पासोनिया हरि! ॥
चित्त न होवो उदास । सोडोनिया तुझी आस ॥
तुकड्या म्हणे जगज्जीवना । आस पुरवी नारायणा! ॥