जरी संसारी गांजलो I

जरी संसारी गांजलो । जरी लोकी दुःखी झालो ।।
जरी व्याधीने पीडलो । जरी आयुष्ये कीडलो ।।
जरी आप्तांनी नाडिलो । जरी मित्रांनी सांडिलो ।।
तुकड्या  म्हणे तू न जावा । ऐसे वाटे माझ्या जीवा  I l