कोणाचेहि न रुचो बोल I

कोणाचेहि न रुचो बोल । सखा सोडूनी विठ्ठल ॥ 
तूचि जिवाचा जिव्हाळा । मना लागो तुझा चाळा ॥
मार्गी चालता बोलता । मनी रंगो तुझी कथा ॥
तुकड्या म्हणो मी उनाड । देवा! पुरवा तुम्ही कोड ॥