गोड गोड तुझी कथा I

गोड गोड तुझी कथा । रुचे आम्हासी अनंता! ॥
तेथे शांत करी मन । सोडवोनी देहभान ॥
नको संबंध हा लावू । जन लोकांचा दिखाऊ ॥
तुकड्या म्हणे भक्ति देई । मन न पाहो कुणाही ॥