जन्मो - जन्मी ऐसी प्रीती I

जन्मो-जन्मी ऐसी प्रीती । मज लागो गा श्रीपति! ॥
सदा संत पायी लीन । वृत्ति बाह्य उदासीन ॥
मुखी गोड नाम साचे । सख्या पंढरीरायाचे ॥
तुकड्या म्हणे लक्ष मन । होवो यातची तल्लीन ॥